खेड (प्रतिनिधी) खेड शहरातील नाना नानी पार्क लगतच्या शेतात असलेल्या विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी पोलिसानी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे
काजीम झाकीर पलनाक रा पटेल मोहल्ला खेड असे त्या मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे २डिसेंबर रोजी दुपारचे जेवण करून मित्राकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता मात्र त्याचा ३ डिसें बर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विहिरीत तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला










