रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्यामार्फत 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय डाक कार्यालय, रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
अदालतीमध्ये सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तक्रीचा उल्लेख सर्व तपशीलासह असावा.
उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इ. पेन्शन अदालतीमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकारणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाईल.
तरी आपला अर्ज एन टी कुरळपकर, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415612 यांच्या नावे 15 डिसेंबर 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार नाही, असे अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी यांनी कळविले आहे.











