भरणे मधील महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

खेड(प्रतिनिधी) खेड येथे महीला जिल्हाध्यक्षा सौ.सुरेखाताई खेराडे आणि खेड शहराध्यक्ष श्री अनिकेत कानडे यांच्या नेतृत्वाखाली भरणे येथील महिलांचा पक्षप्रवेश झाला. महिला प्रदेश अध्यक्ष सौ. चित्रताई यांनी महिलांना व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी या कार्यक्रमास महीला जिल्हाध्यक्ष सौ.सुरेखाताई खेराडे, शहराध्यक्ष श्री अनिकेत जी कानडे,सजीवनी शेलार,कोमल खेडेकर, मा. नगराध्यक्ष आबा जोशी,संजय बुटला, मा.नगरसेवक श्री.परीमल भोसले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष श्री विनोदजी कदम,श्री.अजय तोडकरी, श्री सुहास सोहनी, श्री.उदय खेडेकर, श्री उल्हास बाळ, रोहन राठोड,साई पवार उपस्थित होते.