गुहागर :- तालुक्यातील गुहागर येथील बोऱ्या फाटा येथे किरकोळ कारणातून एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वा. घडली आहे.
सचिन पोळेकर (रा. कोंडकारुळ गुहागर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी फिर्यादी हे बोर्या फाटा येथे बसलेले असताना संशयित आरोपी सचिन पोळेकर तिथे आला. त्याने क्रुझर गाडीच्या कुलाबा-मुंबई येथील वाहतुकीवरून फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्यांच्या डाव्या दंडावर, पायाच्या डाव्या मांडीवर तसेच डोक्यात पाठीमागून मारून दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










