कणकवलीतील सेवा सामाजिक विकास संस्थेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

कणकवली | चंद्रशेखर तांबट : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेवा सामाजिक विकास संस्था, गोकुळधाम बिल्डिंग, कणकवली येथे अभिवादन करण्यात आले.

 

प्रशिक्षक भक्ती वरवडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

यावेळी काशीराम जाधव, श्रेयश शिंदे, तुळशी राऊत या विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. सेवा सामाजिक विकास संस्था नेहमीच मोफत स्पर्धा परीक्षा, पूर्वतयारी प्रशिक्षण तसेच कौशल्य व उद्योजकता विकास यासारखे विविध उपक्रम राबविते. शिक्षकेतर कर्मचारी दिक्षा राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.