रत्नागिरी ः प्रतिनिधी : बँक खाते ब्लॉक होईल असा मेसेज पाठवून तोतयाने फिर्यादीच्या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने 39 हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना शुक्रवार 1 डिसेंबर रोजी रात्री 9.15 वा.घडली आकाशवाणी केंद्राचे पाठीमागे आदीशक्ती येथे घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार,शुक्रवारी अज्ञाताने त्यांच्या मोेबाईलवर एसबीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून केवायसी अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते ब्लॉक होईल असा मेसेज पाठवला.तसेच सेल्फ अपडेट करण्यासाठी मेसेजमध्ये पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले.
या मेसेजवर विश्वास ठेवून फिर्यादीने मेसेजमधील लिंक ओपन करुन त्यामध्ये मागवण्यात आलेल्या माहितीप्रमाणे माहिती भरुन त्यांना आलेल्या ओटीपीसह सर्व माहिती नमूद केली.काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून 38 हजार 444 रुपये ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आल्याचा मेसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.याबाबत त्यांनी मंगळवार 5 डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 420 माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.











