चिपळूणच्या ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार
चिपळूण (प्रतिनिधी) : अॅडिनॉइड सिस्टिक कार्सिनोमा या एका दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचे निदान झालेल्या ७७ वर्षे वयाच्या एका महिला रुग्णावर चिपळूण येथील ऑन्को लाइफ केअर कॅन्सर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. चिपळूणच्या ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर येथील सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. एहसान शेख व त्यांच्या टिमने रुग्णावर यशस्वी उपचार करुन भविष्यातील गुंतागुत टाळली.
अॅडिनॉइड सिस्टिक कार्सिनोमा हा आजार हळूहळू वाढत असला तरी अनेक रुग्णांना तो वेळीच ओळखता येत नाही. एडिनॉइड सिस्टिक कार्सिनोमाची लक्षणे लोकांच्या लक्षात येईपर्यंत, ते शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. हा रोग फुफ्फुसात किंवा हाडांमध्येही पसरू शकतो. चिपळूण ७७ वर्षीय महिला रुग्ण गेल्या ३ वर्षांपासून तोंडामध्ये गाठ असल्याची तक्रार घेऊन रुग्णाने विविध हॅास्पीटल्सला भेट दिली आणि २-३ वेळा बायोप्सी करुनही ती निगेटिव्ह आल्याने योग्य निदान होऊ शकत नव्हते. या गाठीमुळे रुग्णाच्या तोंडातील नसांवरही विपरीत परिणाम होत होता. मात्र अचूक निदानाअभावी योग्य उपचार केले जात नव्हते. त्यानंतर रुग्णाने चिपळूण येथील ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर, चिपळूण येथील सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. एहसान शेख यांची भेट घेतली.
रुग्णाचा वैद्यकिय माहिती आणि लक्षणे पाहून डॉ शेख यांनी या रुग्णाची पुन्हा बायोप्सी केली आणि त्यामध्ये एडिनॉइड सिस्टिक कार्सिनोमा सारख्या दुर्मिळ कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करुन शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रुग्णाची प्लास्टीक सर्जरी देखील करण्यात आली. रुग्णाचे वय आणि कर्करोगाचा हा दुर्मिळ प्रकार पाहता ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. हे आव्हान यशस्वीरित्या पेलत डॅाक्टरांनी रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सुमारे चार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. आता रुग्ण पूर्णतः बरा झाला असून दैनदिन क्रिया सहजतेने करु शकत आहे. सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ एहसान शेख यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपुर्ण टिम तसेच भूलतज्ज्ञ डॉ. अविनाश पवार यांनी रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले. चिपळूण येथील ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर मधील डॉ. अमोल पवार यांच्याकडे रुग्ण सध्या रेडिओथेरपी घेत असून दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.











