माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड तहसीलला निवेदन
खेड (प्रतिनिधी)प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असूनही ओबीसी दाखला मिळत नाही, अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावाचे हमीपत्र घेवून घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुधीर सोनावणे यांना देण्यात आले.
घरकुल मंजूर होवून देखील ओबीसी दाखल्याअभावी घरकुलांचा लाभ घेता येत नाही. यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे. यासाठी ग्रामसभेचा ठराव ग्राह्य धरत घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी हशमत परकार, पन्हाळजे सरपंच तानाजी पाटील, कुळवंडी सरपंच दिलीप निकम, समाजसेवक रामचंद्र आखाडे, किरण मोरे उपस्थित होते.










