जिल्हयातील सर्व ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयांची जबाबदारी आर बी एस के वैद्यकीय अधिकाऱ्यांवर

खेड (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यात सध्या एम बी बी एस वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णालयातील कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यातील आर बी एस के वैद्यकीय अधिकाऱ्यांनवर येवून पडली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये आर बी एस के वैद्यकीय अधिकारी काम पाहत आहेत. विशेष म्हणजे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन आहे. यामुळे . वैद्यकीय अधिकाऱ्यांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ते करत असलेल्या रुग्णालयीन अतिरिक्त कामाचा मोबदला जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मिळावा हि मागणी जोर धरू लागली आहे. सदर मागणीचा जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत होत आहे.