समर्थ स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी

खेड (प्रतिनिधी) वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) मध्ये नर्सरी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. परेश मळगावकर व कर्मचाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करत विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, संस्थेचे खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस.एस. अली आदी उपस्थित होते.