‘संकल्प संस्थेची जानेवारीत मोफत एसएससी व्याख्यानमाला

खेड (प्रतिनिधी) नवी मुंबई- तुर्भे येथील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्यावतीने १३ व १४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत भरणे येथील गणेश मंगल कार्यालयात ग्रामीण भागातील १०वीतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय मोफत एसएससी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेत २२ हायस्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. यामध्ये दहिवली, किंजळे, मांडवे, आंबवली, मोहाने, शिरवली, खवटी, बोरघर, खोपी, कुळवंडी व बोरज परिसरातील शाळांचा समावेश आहे. या व्याख्यानमालेत नाव नोंदणीसाठी ९३२१४०८०९२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन संकल्प स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी केले आहे.