खेड मधील आंजणीत आज कृषी मेळावा

खेड(प्रतिनिधी)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने १५ डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील आंजणी येथील हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे स्मृतीमंदिर सभागृहात सकाळी १० वा कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप, उद्योजक संघटनेचे डॉ. प्रशांत पटवर्धन, एक्सेलचे मुख्य व्यवस्थापक श्रीपाद देशपांडे, घरडा केमिकल्सचे जनरल मॅनेजर अनिल भोसले, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र दापोलीचे डॉ. संतोष वरवडेकर, खेड तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी, विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विवेक शेंड्ये, सीताराम निगुडकर,

दिशान्तर संस्था संस्थापक-अध्यक्ष राजेश जोष्टे यांची उपस्थिती लाभणार आहे.

मेळाव्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज प्रा. लि., वायफोरडी संस्था पुणे, उत्तम जाधव, गौरव घरडे, महेश राठोड आदींचा विशेष सहभाग असणार आहे.

मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. महेश कुलकर्णी, सहाय्यक प्रा. डॉ. बापूसाहेब शिंदे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. श्रीकांत रिटे तर मेळाव्याचे आयोजक म्हणून आंजणीच्या सरपंच लक्ष्मी जावळे, उपसरपंच संतोष कान्हेरे, ग्रामसेवक योगेश होळंब सहभाग घेणार आहेत. मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लवेल मंडळ कृषी अधिकारी जे. के. शिंदे, कृषी पर्यवेक्षक व्ही. टी. जाधव, जी. पी. जगदावे, कृषी सहाय्यक ए. एस. राठोड यांनी केले आहे.