वेंगुर्ले : अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी सावंतवाडी येथे उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांची आज सदीछा भेट घेऊन पोलीस भरती प्रक्रिये बाबत चर्चा केली.
वेंगुर्ला तालुक्यातील काही गावामध्ये बिनविरोध पोलीस पाटील भरती प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच महसूल विभागातील कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव शांताराम कुदळे ( से. नि.) हे ही उपस्थित होते.












