लोटे येथील कंपनीत शिरून धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा

 

खेड(प्रतिनिधी) लोटे एम आय डी सी मधील एका कंपनीत शिरून दोघांनी धमकी घेत गोंधळ घातल्या प्रकरणी दोघां वर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दत्तात्रय आप्पा जाधव यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली

संजय काशिनाथ आंब्रे , व अन्य एकजना वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२.१५ वा. चे सुमारास फिर्यादी यांचे कंपनीची ऑडिट सुरु असताना वरिल दोघे जण फिर्यादी यांचे परवानगी शिवाय जबरदस्तीने व फिर्यादी यांचे कंपनीचे गेटवरील सिक्युरीटी गार्ड यांना कोणालाही नजुमानता फिर्यादी यांचे कंपनीच्या गेटच्या आत व फिर्यादी यांचे ऑफिसमध्ये येवून त्यांनी मी इथला लोकलचा राहणारा आहे त्यामुळे तुमच्या कंपनीत मला काम / कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, मला काम न दिल्यास मी तुम्हाला बघून घेईल असे जबरदस्तीने तुमच्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट मागून आम्ही दोन-तीन दिवसांनी पुन्हा तुमच्या कंपनीत येतो व तुम्हाला बघतो असे जोरजोरात बोलून धमकी देवून तेथून निघून गेले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे