रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या मिरजोळे येथे अज्ञात कारणातून फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी फुकनीने मारहाण केली.याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा.घडली आहे.
जितेंद्र चंद्रकांत मयेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,बुधवारी सायंकाळी जितेंद्र मयेकर हा फिर्यादींना शिवीगाळ करत होता.तेव्हा फिर्यादी यांनी तु शिवीगाळ का करत आहेस असा त्याला जाब विचारला.या रागातून जितेंद्रने फिर्यादींना शिवीगाळ करत त्यांच्या कपाळावर लोखंडी फुकनी मारुन दुखापत केली,तसेच घरातील सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 324,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










