खेड रेल्वे स्थानकातून बाकावर झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरीस

खेड(प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर बाकावर झोपलेल्या एका प्रवाशाचा ४५ हजार रुपये किंमतीचा वन प्लस हा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास घडली

ओमकार भालचंद्र साठे हे तक्रारदार खेड रेल्वेस्टेशन येथील बाकावर झोपलेले असताना तक्रारदार यांचे झोपेचा फायदा घेवून तक्रारदार यांनी त्याचे छातीवर ठेवलेला मोबाईल हॅन्डसेट अज्ञात चोरट्याने चोरुन नेला