देवगड :- देवगडच्या समुद्रामध्ये पुणे चिंचवड येथील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. बुडालेल्यांपैकी राम डिचोलकर हा विद्यार्थी अद्यापही बेपत्ता आहे त्याची शोध मोहीम जोरदार सुरू असून आज स्कुबा डायव्हिंगची पथके मरीन पोलीस बोट यांच्यासह अनेक मच्छीमार राम डिचोलकरचा शोध घेत आहेत.
आज पहाटेपासून प्रांताधिकारी जगदीश काकतकर तहसीलदार आर.जे. पवार यांच्यासह महसूल ची टीम देवगड किनारपट्टीवर राम डीचोलकरच्या शोधकार्यात लक्ष ठेवून आहे.
देवगड दुर्घटना : समुद्रात बुडालेल्या एकाचा अद्याप शोध सुरू, चार विद्यार्थिनींचे मृतदेह सापडले










