लांजा (प्रतिनिधी) तेली समाजातील थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शहरातील तेलीवाडी येथील संताजी जगनाडे महाराज चौकात साजरी करण्यात आली.
लांजा तेलीवाडी येथील संताजी जगनाडे महाराज चौकातील झेंड्याच्या नावाच्या पाटीला हार घालून ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी
नगरसेवक मंगेश लांजेकर , महेश लांजेकर, राजेश लांजेकर, विशाल लांजेकर, उमेश लांजेकर, भरत लांजेकर, राजेश रहाटे, अमित लांजेकर, सागर जावडेकर आदी उपस्थित होते.











