वाटद ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच अमित वाडकर यांचा सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच अमित वाडकर यांचा लोकनेते शामरावजी पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरीच्या पदाधिकारी यांनी यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी वाटद खंडाळा येथील लोकनेते शामरावजी पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्यालयाला नवनियुक्त सरपंच महोदयांनी सदिच्छा भेट दिली आणि संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेच्या प्रत्येक लोकपयोगी उपक्रमासाठी आपण सहकार्य करु असे यावेळी सरपंच वाडकर म्हणाले. यावेळी अध्यक्ष संजय शितप, नामदेव चौगुले, नंदकुमार बेंद्रे, विनायक कींजळे, सुजित दुर्गवळी, सहदेव वीर, उदय महाकाळ, प्रकाश वीर आणि अरुण मोर्ये उपस्थित होते.