महिला बचत गट, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले | प्रतिनिधी : आरवली ग्रामपंचायत सरपंच तथा भाजप युवामोर्चा सक्रिय कार्यकर्ते समीर कांबळी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत गावातील महिला बचत गट आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिर, श्री. देवी सातेरी मंदिर आणि श्री देवी जागबाई मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. आणि स्वच्छते विषयी गावात जनजागृती केली.
सामाजिक क्षेत्रातील चांगल्या कामामुळे आरवली सरपंचपदी कांबळी यांची बिनविरोध निवड झाली होती. सरपंचपदी निवड झाल्यानंतर सुध्दा त्यांनी पूर्वी प्रमाणेच सामाजिक क्षेत्रातील कामामध्ये भरारी घेतली. आरवली गावातील प्रसिध्द जत्रा श्री देव वेतोबा त्याच प्रमाणे श्री देवी सातेरी, श्री. देवी जागबाई या देवांच्या जत्रेसाठी आरवली कार्यक्षेत्रातील देऊळवाडी, बांधवाडी परिसरातील स्वत:हा प्रत्यक्षात स्वच्छता अभियानात उतरून बचत गट महिला, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविले त्यांच्या सोबत त्याचे सहकारी सुहास केरकर, महादेव नाईक, आरवली ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्त्री यांनी या स्वच्छता अभियानात सहकार्य केले.











