नांदगाव l वार्ताहर : ओटव बौध्दवाडी येथील रुक्मिणी राजाराम तांबे (९०)यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले.जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती मंगेश तांबे यांच्या त्या आई होत्या.
सर्वांशी मिळून मिसळून राहणा-या रुक्मिणी तांबे यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.












