चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लि. चिपळूण या संस्थेमध्ये हंगाम २०२३-२४ च्या शासकीय आधारभूत दर भात खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी संघाचे चेअरमन दिलीप माटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन अजीत कोकाटे, ज्येष्ठ संचालक अशोक कदम, पांडुरंग शिर्के, कृष्णा कालबे, रघुनाथ माळी, कृष्णा सावंत, दिनेश खांबे, विजय माटे, विलास चिपळूणकर, ज्येष्ठ संचालिका स्मिता सुभाषराव चव्हाण, तज्ज्ञ संचालक रमेश राणे, फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चिले, तालुका उपविभागीय कृषि अधिकारी माने, तालुका कृषि अधिकारी मेत्रे, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषि सहाय्यक मनोज गांधी, शेतकरी शांताराम निवाते, सदाशिव बुरटे, संघाचे व्यवस्थापक पांडुरंग कामळे व संघाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भात खरेदी संदर्भातील सर्व माहिती फेडरेशनचे अधिकारी चिले यांनी दिली. यावर्षी भाताला प्रती किंवटल २ हजार १८३ रूपये दर शासनाने घोषित केला आहे. ज्या शेतकऱ्यांची ई- पीक पेऱ्याची नोंद केली आहे त्यांनी संघांच्या कार्यालयामध्ये येऊन भात विक्रीसाठीचे रजिस्ट्रेशन करावे. त्याकरिता शासनाने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. तसेच भात खरेदीची मुदत ३१ जानेवारी २०२४ ‘पर्यंत निश्चित केली आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन दिलीप माटे यांनी केले आहे.
भात विक्री करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींमध्ये प्रामुख्याने ई-पीक पाहणी अॅपद्वारे केली आहे. परंतु या अॅपमधील नोंद २०२३-२४ च्या सातबारामध्ये दिसत नाही त्यांनी ते सातबारा संघाचे कार्यालयात जमा करावेत. जिल्हाधिकारी रत्नागिरी व तहसिलदार चिपळूण यांच्याकडून प्रमाणित करून या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे संघाचे सर्व संचालक मंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.











