चिपळूण तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत बोरगांव नं. १ शाळेची उत्कृष्ट कामगिरी

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरगांव नं. १ शाळेने तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.

चिपळूण पंचायत समिती शिक्षणविभाग आयोजित परसबाग स्पर्धेत चिपळूणमधील जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेने परसबागेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड केलेली होती. त्यामध्ये मिरची, गवार, भेंडी, दुधी भोपळा, टोमॅटो, दोडके, लालमाट आणि वांगी इत्यादी प्रकार होते. जि.प. शाळा बोरगांव नं. १ ने लागवड करून त्याची योग्यरित्या काळजी घेतली.

पोषण आहारामध्ये वरील सर्व भाज्याचा वापरही केला. सदर स्पर्धेत भाग घेवून बोरगांव शाळेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. इरनक यांच्या हस्ते शाळेस द्वितीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. परसबाग स्पर्धेत मुख्याध्यापक राजेंद्र कदम, शिक्षिका श्रध्दा शिगवण, शिक्षक प्रताप शिरतोडे, लुकमान तडवी त्याचप्रमाणे दर्शना काताळकर मयुरी काताळकर आणि शाळेतील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.