अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी माना व 26 हजार वेतन द्या आदी मागण्यासाठी भव्य मोर्चा

सिंधुनगरी | प्रतिनिधी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी सिंधुनगरी पुन्हा दुमदुमली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकर मानावे त्यांचे मानधन वाढवावे निवृत्ती वेतनात वाढ करावी या विविध मागण्यांसाठी सोमवारी या कर्मचाऱ्यांचे नेत्या कमलताई परळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातून अंगणवाडी कर्मचारी एकवटल्या होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभराप्रमाणे सिंधुर्गातही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. चार डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर असून सरकारने सकारात्मक तोडगा न काढल्यामुळे संपाचे आंदोलन सुरूच आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुर्गातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी भवनावर हा मोर्चा नेला. सरकार या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देत नाही महिला नेत्या कमलताई परुळेकर यांनी आक्रमक विचार व्यक्त केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले.

अंगणवाडी कर्मचारी पूर्णवेळ काम करत असून त्यांना सरकारी नोकर मानावे, त्यांना दरमहा 26 हजार रुपये मानधन द्यावे, मानधनाच्या निम्मे त्यांना निवृत्तीवेतन मिळावे, तीन लाख रुपये ग्रॅच्युईटी द्यावी, अंगणवाडीतील मुलांना मिळणारे पोषण आहाराचे दर तिप्पट करून कुपोषण थांबवावे अशा मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सिंधुगातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. जवळणात मंदिराकडून थेट जिल्हाधिकारी भवनावर हा मोर्चा गेला व त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी भावना समोर धरणे आंदोलन संपन्न झाले.