
.भालावल शाळेच्या शतकमहोत्सवी वर्ष समारोप प्रसंगी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
भालावल गावची शाळा आज १०० वर्षात पदार्पण करते येवढा मोठा प्रवास हा ग्रामस्थ शिक्षकांच्या मेहनतीच फळ असून बदलत्या जमान्यातही आपल्या मराठी शाळा डौलात उभ्या आहेत. आणि ती टिकविणे आपल्या हाती आहे.आपलं धेय्य जर मोठ असेल आणि त्याला मेहनतीची कष्टाची जोड असेल तर मराठी माध्यमाचा विद्यार्थी सुद्धा आय. पी एस. ,आय. ए. एस. कलेक्टर बनू शकतो . अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्या समोर आहेत.आपल्या जिल्हयातील मुल कोंकणातील मुले दहावी बारावी ला अख्या महाराष्ट्रात वर्चस्व दाखवतात मात्र स्पर्धा परिक्षा एम पी. एस सी., यू. पी. एस. सी. मध्ये मागे राहतात यालाही कारण दहावी बारावी नंतर न मिळणार मार्गदर्शन आणि न मिळणारी योग्य दिशा. आज सुदैवाने रवींद्र चव्हाण साहेबां सारखे कर्तुत्वान पालकमंत्री लाभले त्यामुळे जिल्यातील या ही समस्या भविष्यात दिसणार नाहीत.
आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून गावच्या विकासासाठी शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही केव्हाही हक्काने हाक मारा सदैव तुमच्या सोबत असेन अशा भावना माजी आमदार भाजप चे नेते राजन तेली यांनी व्यक्त करताना तिन दिवस भरगच्च कार्यक्रम करत शतक महोत्सव यशस्वी करणाऱ्या ग्रामस्थ, शिक्षक यांचेही कौतुक केले. यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते सावंतवाडी नगर पालिका माजी नगराध्यक्ष संजू परब,राष्ट्रवादी कोंकण महिला विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब, राष्ट्र वादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सामजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, भाला वल सरपंच समिर परब, आनंद नेवगी,उपसरपंच अर्जुन परब, केंद्र प्रमूख श्रद्धा महाले, डेगवे सोसायटी चेअरमन प्रविण देसाई, डेगवे सरपंच राजन देसाई, सरमळे सरपंच विजय गावडे, मुख्याध्यापिका नम्रता कोठावळे, काजू सूपारी व्यापारी भाऊ वळंजू, शाळा व्य.अध्यक्ष आत्माराम परब, तांबुळी सरपंच,वेदिका नाईक आदिसह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजू परब यांनी ही कार्यक्रमाचे कौतुक करताना मराठी शाळा टिकल्या पाहिजेत मराठी शाळा टिकल्या तरच इथला विद्यार्थी टिकेल मराठी माध्यमातही मोठे अधिकारी बनण्या इथपत शिक्षण मिळू शकते फक्त त्यासाठी विद्यार्थी बरोबर शिक्षकांनाही मोठी मेहनत घ्यावी लागेल .
असे म्हणत शुभेच्छा दिल्या यावेळी सामजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा देताना ग्रामस्थ पालक यांचे कौतुक केले . व गावच्या सर्वागीण विकासासाठी हातभार लावण्याचा शब्द दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी ही कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा देताना आपण याच गावची कन्या असून मी जिल्हा भर फिरत असताना माझी पहिली ओळख ही भालावल गावची कन्या अशी होते याचा मला अभिमान आहे या गावासाठी जे काही करता येईल ते करण्याच आश्वासनं नाही तर शब्द देतो असे सांगत आपल्या बालपणीच्या आठवणी ही ताज्या केल्यात यावेळी कार्यक्रमात मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्वखर्चातून पुस्तकेही शाळेसाठी दीली. उपास्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशालेतील आजी माजी शिक्षकांचा, शाळेच्या जडण घडणीत हातभार लावणाऱ्या महनीय व्यक्तीमत्वांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी केक कापून शाळेचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला.
गेले वर्षभर विविध कार्यक्रम शाळेत साजरे करण्यात आले.या अंतिम तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर, खासदार विनायक राऊत, शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, आदींसह महनीय व्यक्ती उपस्थीत राहत शाळेच्या सर्वागीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षक, पालक, आजी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.या तीन दिवसात शाळेच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पाककला , फनी गेम्स, पारितोषिक वितरण सोहळा, मुलांचे विविध कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, ग्रामस्थांची भजने, आजी माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, सांस्कृतीक कार्यक्रम, आदी कार्यक्रम पार पडलेत . अंतिम दिवशी कलेश्वर दशावतार नाटय मंडळाच्या गंगाजल या नाटय प्रयोगाने सांगता करण्यात आली.अंतिम दिवशी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता कोठावळे मॅडम यांनी तर सूत्रसंचालन व आभार शाळेचे शिक्षक विठ्ठल कुंभार यांनी मानलेत.












