दोडामार्ग | सुहास देसाई : हेवाळे खरांडीसह तिलारी खोऱ्यात टस्कर सह तीन हत्तीचा हैदोस चालू असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आता हत्ती थेट घराशेजारी येऊ नुकसानी करू लागल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी आज अखेर वनविभागाला घेरांओ घातला. स्थानिकातून ग्रामस्थांची तात्काळ हाlत्ती हकाऱ्यांची नेमणूक करून हत्तींना वस्तीपासून दूर ठेवण्यात यावे, तसेच झालेली नुकसान भरपाई वाढीव व वेळेत मिळावी आदी मागण्या करत शेतकरी आक्रमाक झाले होते
दोन दिवसापासून विजघर परिसरात टस्कराने हजेरी लावली आहे. येथील शेतकऱ्यांच्या बागेत अक्षरशः नुकसानी सत्र सुरूच ठेवले आहे. टस्कर सह तीन हत्तीचा सध्या बांबर्डे येथे वावर चालू आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता हा टस्कर थेट घरा शेजारी आला. अन्नाच्या शोधात घराजवळ आलेल्या टस्कराने सिद्धेश राणे यांच्या घरालगत असलेले केळी आणि माड उध्वस्त केले. टस्कराला घरासमोर पाहुन घरातील मंडळींची धावपळ उडाली हीती टस्कर वस्तीत आल्याची बातमी कळताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा करून, फटाके फोडून टस्कराला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. सध्या हा टस्कर शेती व फळबागायतींचे व नारळ सुपारी काजू आंबा पिकाचे अतोनात नुकसान करत आहे. त्यामूळे शेतकरी हतबल झाले आहे.
वाढत्या नुकसानी सत्र प्रकारामुळे लाखो रुपयांची नुकसानी होत आहे हत्तीचा हैदोस व घडलेला प्रकार पाहता ग्रामस्थ भयभीत झाले असून तेवढाच त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. गेले आठ दिवस टस्कराचा बांबर्डे येथे वावर असून अद्यापही त्या टस्कराला हाकलण्यास वनविभागाने हाकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. या अगोदर हत्तीची चाहूल लागताच स्थानिकातून हाकाऱ्यांची नेमणूक केली होती. मात्र, यावेळी तसे झालेले नाही. यासाठी ग्रामस्थांनी थेट वनविभागाला घेरओ घातला. कार्यालयात उपस्थित कर्मचारी सुनील लाड व वनक्षेत्रपाल यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवा तालुकाप्रमुख मदन राणे, मीडिया संपर्क प्रमुख संदेश राणे, उपजिल्हासंघटक विजय जाधव, उपविभाग प्रमुख प्रसिप सावंत, शेतकरी तातोबा देसाई, भरत गवस, हनुमंत गवस, वृषभ देसाई, प्रवीण देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी वनविभाग सुसेगाद असून उपाययोजना राबविण्यास हलगर्जीपणा पणा करीत आहे. गेले आठ दिवस झाले टस्कर बांबर्डे परिसरात हैदोष घालत आहे. त्याचा वावर वाढत असूनही मात्र वनविभागाने अद्यापही हकारी नेमलेले नाहीत, याचे कारण काय? असा अहवाल उपस्थित केला. यावेळी सुनील लाड म्हणाले की, घोटगेवाडी येथे प्रशिक्षण कॅम्प करायचा आहे. त्या कॅम्प मध्ये स्थनिक युवकांना हत्ती हाकलण्याबाब योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाई. त्यातून हाकारी नेमण्यात येतील. परंतु यावर शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. सध्या टस्कराचा वावर चालू आहे. तो शेतीची भरमसाठ नुकसान करीत आहे. एवढ्यावरच न थांबता आता थेट घरा पर्यंत येऊ लागल्याने ग्रामस्थांच्या जिवीतलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या अगोदर जसे स्थानिकातूनच हकारी नेमले जात होते त्याच प्रमाणे सध्या तात्काळ हाकारी नेमण्यात यावेत. जेणेकरून त्या टस्कराला वस्थीपासून लांब ठेवण्यास ते हकारी वनविभागाच्या कर्मचार्यांबरोबर काम करतील. तात्काळ हकारी नेमाणे गरजेचे असून याबाबत लवकर कार्यवाही करावी ही मागणी लावून धरली. तसेच होत असलेल्या नुकसानीची भरपाई देखील वाढून देण्याची मागणी केली आहे. या घेराव मुळे वन विभाग कोणती कार्यवाही करते याकडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे











