गुहागर | प्रतिनिधी : दान देताना हातचे राखून न देता सढळ हस्ते द्यावे, याकरता दानशुर कर्ण आपला आदर्श असावा असे प्रतिपादन श्री मुकुंद गणेश गद्रे यांनी केले, गुहागर हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले कि, कोणतेही काम अथवा क्षेत्र कमी जास्त महत्वाचे नसते तर आपला दृष्टीकोन महत्त्वाचा असतो,विद्यार्थ्यांनी या आपल्या संस्कार दशेतच आपले आदर्श व्यक्तीमत निवडले पाहीजेत.
गुहागर हायस्कूल चे 1975 चे एस एस सी बॅच चे विद्यार्थी असलेले श्री मुकुंद गणेश गद्रे यांनी गुहागर हायस्कूल मध्ये प्रोजेक्टर,स्क्रीन, लॅपटॉप आदी डिजीटल रूम चे साहित्य भेट दिले.या समारंभाला गुहागर एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी संदिप भोसले, शालेय समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर, संचालक पराग भोसले, ज्योती परचूरे 1975 चे SSC बॅचे माजी विद्यार्थी राजेंद्र आरेकर, रमेश बारटक्के, नंदकुमार ढेरे,शरदचंद्र सोमण,श्री उदेग,ओंकार गद्रे, श्री काॅम्पूटर चे मोरे सर, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पर्यवेक्षक विलास कोरके, दिलीप मोहिते, सोनाली हळदणकर, मनीषा सावंत, व विद्यार्थी उपस्थित होते