महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुक्यातील नूतन पदाधिकांऱ्याची नियुक्ती तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार

Google search engine
Google search engine

पाटपन्हाळे | वार्ताहर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुक्यातील नूतन पदाधिकांऱ्याची नियुक्ती तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार शृंगारतळी येथील गुहागर तालुका मनसे संपर्क कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर संहसंपर्क अध्यक्ष समिर जोयशी यांच्या नेतृत्वाखाली रानवी शाखा अध्यक्ष सुहास चोगले,पिंपर शाखा अध्यक्ष राकेश रामचंद्र मोरे. वेलदुर शाखा अध्यक्ष सिद्धांत पाटील, कौंढर गट अध्यक्ष सचिन जोयशी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी गुहागर तालुक्यातील मनसेचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेल्या वैभवी विनोद जानवळकर ( ग्रामपंचायत जानवळे), रजनी रविंद्र कदम, वर्षा विलास शितप, सचिन नारायण जोयशी, विनेश सीताराम तांबे (ग्रामपंचायत कौंढर काळसुर)या सर्व सदस्यांचा अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मनसे गुहागर तालुकाअध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सर्व निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक करून सदस्य पदाचा उपयोग जास्तीत जास्त आपल्या प्रभागातील जनतेसाठी करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गुहागर तालुक्यात मनसेच्या पक्षाची ताकद व संघटन वाढत आहे, युवावर्ग मनसेकडे आकर्षित होत आहे, नागरिकांच्या न्याय- हक्कासाठी मनसे सतत लढा देत आहे, मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार’ “गाव तेथे मनसे शाखा ‘अभियान सुरू झाले आहे. घराघरात मनसे पोहोचविण्याचे काम सर्व कार्यकत्यांनी करायचे आहे. निवडुन आलेल्या प्रभाग सदस्यांनी प्रभागामध्ये नागरिकांसाठी काम करायचे आहे, प्रभागातील समस्या जाणून घेतल्या पाहीजेत, निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांनी मासिक व ग्रामसभेला उपस्थित राहुन नागरिकांचे प्रश्न मांडले पाहिजेत तरचं तो सदस्य पुढील काळासाठी सरपंचपदापर्यंत पोहोचू शकतो. तसेच नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्ष वाढविण्यासाठी काम केले पाहिजे.आला.यावेळी विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सागर शिरगावकर, उपतालुका अध्यक्ष सचिन जोयशी, शाखा अध्यक्ष सुनिल मुकनाक, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक विक्रम जोयशी , राहुल जाधव, विवेक जानवळकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले. तर आभार विनोद जानवळकर यांनी केले