संजय गांधी निराधार समितीची बैठक 

 

दोडामार्ग l सुहास देसाई :संजय गांधी निराधार समिती ची बैठक नुकतीच तहसीलदार कार्यालयात सुधीर आबा दळवी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

या बैठकीला 36 प्रस्तावापैकी 35 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर 1 प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.त्यावेळी समितीचे सचिव तहसीलदार श्री. संकेत यमगर यांनी काम पाहिले. सर्व सदस्यांचे स्वागत करून सभेचे कामकाज सुरु केले त्यावेळी समिती सदस्य श्री. दीपक जाधव, अंकुश वेटे, अभिमन्यू कुबल, सौ. दिक्षा महालकर, पंचायत समिती प्रतिनिधी व नगरपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सभेत चर्चा होऊन खालीलप्रमाणे प्रस्ताव मंजूर करण्यात आले 1) संजय गांधी निराधार योजना – 1) रेखा रामचंद्र मणेरीकर – मणेरी .2) प्रतिभा प्रकाश कुतनोर – कसई दोडामार्ग . 3)प्रमिला प्रेमानंद गवस – बोडदे. 4) दिव्या भारत चौलेकर – कोनाळ . 5) साक्षी सुनिल राणे – साटेली भेडशी . (6) हर्षवती हरिश्चंद्र नाईक – पिकुळे . 7) रत्नप्रभा रत्नकांत गवस – आयी . 8) नयना खेमराज केसरकर – सोनावळ . 9) सुलावती साबा गवस – वझरे . 10) संगीता गणेश गवस – माटणे .11) अस्विनी अनंत गवस – आबडगाव 12) लीना रायमन फर्नांडिस – साटेली भेडशी. 13) रंजना रवींद्र गवस – आबडगाव .14) चंद्रावती चंद्रकांत गवस – शिरंगे पुनर्वसन.15) मंजुषा महेश देसाई – केर 16) महेश दशरथ देसाई केर 17) मनाली महेश महालकर पिकुळे 18) निर्मिती नवनाथ साळोस्कर खोक्रल 19) लक्षदीप जयवंत सातार्डेकर 20 ) तेजस महेश म्हावळणकर 21) आनंद अमरनाथ दळवी घोटगे 22) योगेश भिकाजी गवस उसप 23) तन्मय विजय सुतार कुंब्रल 24) दिव्यांनी दामोदर गवस झरेबाबर (2) श्रावणबाळ योजना -1) चंद्रकांत रामा घाडी – वझरे .2) सुमित्रा वसंत गवस -कुडासे .3) सुधीर भिसाजी गवस – तेरवण मेढे . 4) महादेव लाडू धुरी – कुडासे .(5) उतारा उत्तम गवस -आबडगाव . 6) भानुमती फोंडू गवस – कसई दोडामार्ग . 7) चंद्रावती चंद्रकांत कवठणकर – कसई दोडामार्ग. 8) शांताराम नारायण गोसावी – आयी 9) सुमती बाळू गवस – आबडगाव . 10) सुप्रिया कृष्णा नाईक – मोरगाव 11) काशी फटी मूळगावकर कसई दोडामार्ग 12) माया शांताराम पेडणेकर 65 वर्षे पूर्ण न झाल्याने नामंजूर करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी पेन्शन बाबत आढावा घेऊन पात्र लाभार्थाची पेन्शन नोव्हेंबर 2023 महिन्यापर्यंत त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याची अशी माहिती अध्यक्ष श्री. सुधीर आबा दळवी यांनी दिली.