‘कोंब्यांची जत्रा ‘ म्हणून प्रसिद्ध
न्हावेली । प्रतिनिधी : ३६० चाळ्यांचा अधिपती प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. हा जत्रोत्सव कोंब्यांची जत्रा म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा देव म्हणून श्री देव घोडेमुखाची ख्याती दुरवर पसरली आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला नवस बोलला जातो व
जत्रोत्सवावेळी फेडला जातो. ही शेकडो वर्षाची परंपरा आजही भक्तीभावे सर्व भक्तगण श्रद्धेने
पाळली जाते. दरवर्षी वाढत चाललेली भक्तगणांची गर्दी या
देवाची महती सांगून जाते. या जत्रेसाठी सिंधुदुर्ग सोबत
मुंबई पुणे कोल्हापूर रत्नागिरी तसेच गोमंतक व कर्नाटक राज्यातूनही भाविक दर्शनासाठी येतात. उंचावर असलेल्या श्री देव
घोडेमुख दर्शन घेऊन मन प्रसन्न करतात देवस्थान कमिटी व योग्य करुन हा कार्यक्रम साजरा करतात. या जत्रोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.












