सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्ती शिफारस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महिला संयोजक सौ. शिल्पा मराठे व महिला समन्वयक सौ. आम्रपाली सारवे यांनी केली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी मिसबा शेख यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, माजी सभापती मानसी धुरी, शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर आदी उपस्थिती होत्या. मिसबा शेख यांना यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांकडूनही पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.











