मोर्चा काढण्यासाठी समाजवादी आणि काँग्रेसची मदत घ्यावी लागते हे ठाकरेंचे दुर्दैव

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याच समाजवादांना आयुष्यभर विरोध केला

बाळासाहेब असते तर या पिता-पुत्रांना मातोश्री बाहेर काढले असते

कणकवली : ज्या समाजवाद्यांना विरोध हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केला त्याच्या विरोधात मोठ्या सभा घेतल्या. त्यांच्याबरोबर संघर्ष केला. त्याच समाजवाद्यांचा झेंडा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या बापलेकांच्या डोक्यावर फडकताना बाळासाहेब ठाकरेंनी जर पाहिलं असतं तर या दोघांनाही मातोश्री बाहेर काढून हाकलून लावलं असतं. आज ठाकरे यांची एवढी पण ताकद नाही की मुंबईमध्ये स्वतःच्या ताकदीवर एखादा मोर्चा काढायचा. त्याना मोर्चे काढायचं असेल तर काँग्रेसची मदत घ्यावी लागते. समाजवादी यांची मदत घ्यावी लागते. आणि मोठा भारतीय जनता पक्षावर टीका करतो.

 

यावेळी आमदार नितेश राणे ओम गणेश निवासस्थानी आयोजिय पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

पुढे ते म्हणाले, नागपूर फ्लाईटने प्रवास करताना काँग्रेसचे काही नेते मंडळी आजूबाजूच्या सिटवर बसून प्रवास करत होते. त्यांची धारावीमध्ये निघालेल्या मोर्चा संदर्भात चर्चा सुरू होती. यामध्ये एक वाक्य एका मुंबईच्या काँग्रेस नेत्याने उच्चारले, ते वाक्य धारावीच्या मोर्चाच विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने करणार होत. त्यांनी आजूबाजूच्या नेत्यांना विचारलं की “उद्धवजी मोर्चा क्यु निकाल रहे है.?” बंगले पे अभितक फोन आया नाही क्या ? फोन आजाता तोफिर सेटलमेंट हो जाती. तर दुसऱ्या चर्चेमध्ये निघालेला धारावी मोर्चा नव्हता. पण तो मातोश्री बचाव मोर्चा नक्कीच होता पण तो धारावीच्या निमित्ताने निघालेला होता, अशा शब्दात आ. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

 

पूर्ण आयुष्यात ज्या उद्धव ठाकरेंनी दलालीवरच काढलं, ज्याचा कुठेही म्हणजे त्याच उत्पन्न कुठून आहे ते महाराष्ट्रातल कोण अजूनपर्यंत सांगू शकत नाही, त्याच कुटुंब कुठून कमवत, कुठून कर भरत त्यांचा अधिकृत धंदा कोणता आहे हे कोण सांगू शकत नाही, आणि उद्धव ठाकरे आणि त्याचा कामगार व त्याचा दुसरा मुलगा हे दुसऱ्यांवर दलाली आणि बूट चाटण्याचे आरोप करतात, हे फार मोठ आश्चर्य आहे.

 

स्वतःच्या घरात काँग्रेसवाल्यांच्या बुटांचा जो ढीग लागला आहे. रोज एक बूट चाटण्याचा कार्यक्रम मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर सुरू असतो. त्यांनी दुसऱ्यांवर बूट चाटण्याचे, दलालीचे आरोप करू नये. तर तुझ महाविकास आघाडीचे सरकार असताना तू कुठून – कुठून कशी दलाली करायचा, याची यादी जर आम्ही बाहेर काढली ना तर धारावी मध्ये बनत असलेल्या चपलेचा हार घालून तुझी दिंड लोक काढतील. म्हणून धारावी पुनर्वसनाच्या अगोदर तुझ्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंताजी तुला लागली आहे ना त्यामुळे निघालेला हा मोर्चा आहे.

 

स्वतःच्या ताकदीवर मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची उद्धव ठाकरे यांची ताकद नाही. त्याला मोर्चे काढायचं असेल तर काँग्रेसची मदत घ्यावी लागते. समाजवाद्यांची मदत घ्यावी लागते. आणि हा भारतीय जनता पक्षावर टीका करतो. ज्या अदानींवर टीका करता मात्र त्याच अदानिंची कोरोना काळात तुम्ही मदत घेतली होती. कोरोना काळात हे धान्य वाटप झालं ते अदानी समूहाकडून झालं. त्या पॅकेटवरही तुझ्या खासदारांबरोबर अदानीच नाव पण असायचं असा हा उद्धव ठाकरे नावाचा नमकहराम स्टेजवर बसून मोठ्या – मोठ्या बाता करत होता.

 

या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा देखील चांगला समाचार घेतला. तर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आ. नितेश राणे यांनी जशास तसे उत्तर देत फटकारले आहे. संजय राजाराम राऊत संसदेमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत जे काय दोन – तीन तरुण घुसले तो बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत होता. मग तुझ्या मालकाचे महाविकास आघाडीचे सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईनची कंपनी उघडतो, स्वतःच्या मुलीच्या अकाउंट मध्ये खिचडी चोरीचे पैसे टाकतो, मग तेव्हा देशातील बेरोजगारांचा विचार का केला नाही ? जो तू भ्रष्टाचार केला, वाईन कंपनी उघडून त्यात तुम्ही लोक धंदे करायला लागला, तेव्हा देशातील बेरोजगार मराठी मुलांबाबत विचार का केला नाही ? तुझा मालक मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रीपद कोणाला दिले ? त्याच्याच मुलाला. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? त्याच्या मेव्हण्याला. तेव्हा बेरोजगारीबद्दल विचार केला नाही. संजय राऊत ज्या काँग्रेसची चाटुगिरी करत बसलेला आहे. मग हे दोन – तीन तरुण आणि त्यात ती मुलगी अटक झाली. जिने या संसदेत हल्लाबोल केला. ते दोन – तीन अटक झालेले तरुण त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा काय संबंध आहे? कारण भारत जोडो यात्रा जे राहुल गांधींची निघाली त्या भारत जोडो यात्रेत आणि काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत यातील काही लोक सामील होते. त्याच बरोबर नीलम नावाची जी तरुणी अटक झालेली आहे, तीच भाषण सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती भारतीय जनता पक्षावर टीका करत आहे. पण काँग्रेस व अन्य पक्षाच्या लोकांबद्दल चांगलं बोलते.

 

पण जे दोन – तीन तरुण संसदेत घुसले त्यांचे राहुल गांधी कनेक्शन आहे का ? काँग्रेस पक्षाशी कनेक्शन आहे का ? याबद्दल संजय राऊत ने सकाळी उठून आमच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर टाकावी, असंही श्री. राणे म्हणाले.

 

जसं काल धारावीकरांसाठी उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला. तसे अन्य पद्धतीने एक मोर्चा पत्राचाळच्या मराठी माणसांसाठी सुद्धा काढला पाहिजे होता. खंबाटाच्या कामगारांसाठी पण काढला पाहिजे होता. पत्राचाळची माणसं आज का बेकार झाली ? त्या मराठी माणसांचं काय ? याचे उत्तर संजय राऊत च्या मालकाने द्यावे, असाही सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

 

कुठला फोटो, कुठला आहे तो, जो व्हिडिओ आम्ही सभागृहामध्ये दाखवला तो बडगुजर च्या फार्महाऊसवरचा आहे. तिथे तो सलीम कुत्ता आलेला. हे महाविकास आघाडीचे लोक बोंबलत आहेत ना त्याच्याशी आणि गिरीश महाजन यांच्याशी काही संबंध नाही. म्हणून या दहशतवाद्यांना संरक्षण देण्यापेक्षा, यांची बाजू घेण्यापेक्षा या बडगुजर सारख्या देशद्रोहीना अटक कशी होईल यावर लक्ष द्यावे.

 

स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मी स्वतः किती नालायक असलो तरी चूक माझी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असतो. मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ पाटणकरांना दिला. तेवढा वेळ आमदार, खासदार, शिवसैनिकांना दिला असता तर, आज सरकार पडलं नसतं. म्हणून स्वतःचा नाकर्तेपणा कुणा दुसऱ्यावर टाकू नये.

 

संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि त्या तरुणांचं काय कनेक्शन आहे, याची पडताळणी करावी. ते भारत जोडो यात्रेत दिसले होते का. त्यांनी भाजपवर टीका व काँग्रेसचे गुणगान असं का केलं? म्हणून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यापेक्षा तुझा जो नवीन मालक व त्याची नवीन मम्मी जी दहाजनपथवर बसते तिला विचार की काँग्रेस व हल्ला करणारी मुलं यांचा काँग्रेसशी काय संबंध आहे ? व त्यावर उत्तर दे मग आम्हाला प्रश्न विचार, असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.

 

ज्या गुजराती समाजावर हे टीका करतात. त्याच तुझ्या मालकाला सांग गुजराती समाजाच्या माणसांची मदत न घेता गुजरातला जा, आणि घराचा मेंटेनन्स भरून दाखव. दोन वेळ खाऊन दाखव. अन्य वेळी यांचे खर्च भागवण्यासाठी, लंडनला जाण्यासाठी, गुजराती समाजाची माणसं लागतात. मग ढानुबे नावाचे बिल्डर कोण आहेत ? त्यांचे उद्धव ठाकरेंशी संबंध काय आहेत ? मग आम्हालाही उद्धव ठाकरे आणि मातोश्री व गुजरात कनेक्शन काय आहे ? यावर एक वेगळी पत्रकार परिषद घ्यावी लागेल, असंही ते म्हणाले.

 

बॉक्स ;

 

त्यांच नाव सुषमा अंधारे नाही ; सुषमा फर्निचरवाला आ.नितेश राणेंचे अंधारेंवर टीकास्त्र

 

त्या सगळ्या शिवसेनेकडून टेबल, खुर्च्या, फर्निचर मागतात. म्हणून सुषमा फर्निचरवाल्या ताईंना मी सांगेन तुमच्या आरोपांमध्ये किती दम आहे ना हे तुम्ही बाहेर बोलण्यापेक्षा तुमच्या आमदारांना सभागृहात बोलायला सांगा. तर मग सुषमा फर्निचरवाल्यांच्या स्टेटमेंट ला अर्थ राहील.

 

आमच्या संसदेकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर कोणालाही सोडणार नाही. आणि पुन्हा संसदेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोण करणार नाही, असा बंदोबस्त अमित शहा करतील, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

 

बॉक्स ;

संशयित आरोपींसह, आदित्य ठाकरे यांची देखील चौकशी होईल – आ. नितेश राणे

 

दिशा सालीन प्रकरणी तिच्या आई – वडिलांची दोन दिवसांपूर्वी स्टेटमेंट झालेली आहे. लवकरच संशयित आरोपींसह, आदित्य ठाकरे यांची देखील चौकशी होईल. लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल.

 

बॉक्स ;

 

महिनाभरात सिंधुदुर्ग ची आरोग्य व्यवस्था सुधारणार – आ. नितेश राणे

 

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी त्यांच्या दालनामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातील आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या, त्यांचे प्रलंबित पगार, रुग्णालयांची दुरावस्था याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हा व तालुका स्तरावरून काम करणारा अधिकारी वर्ग हा वरपर्यंत खरी माहिती देत नाही, अशी आमची सर्वसामान्यांची भावना आहे. त्याचप्रमाणे कामगारांची रिक्त पद भरत नसाल, तसेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेल्या कामगारांचे पगार देत नसाल तर ते शंभर टक्के योगदान त्यांच्या कामांना देणार नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण होईल. तर उपस्थित केलेले प्रश्न गांभीर्याने घेत आरोग्यमंत्र्यांनी एक महिन्यात आरोग्य व्यवस्था सुधारेल व ते प्रत्यक्षात दिसेल असे आश्वासन दिल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली.