कळसुलकर ज्यूनीअर कॉलेज च्या 95-96 च्या बॅचच गेटटुगेदर
“एक बार फिरसे जी लेते वो लम्हे म्हणत जगाच्या कानाकोपरयातून जमले सवंगड़ी
सावंतवाडी :भले बुरे जे घडून गेले
विसरूनी जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर …या वळणावर
रोजच्या रूटीन मधून आयुष्याच्या अश्याच एका वळणावर आपल्या शैश वातील सवंगड्यांसोबत रिलैक्स क्षण अनुभवन्यासाठी कळसुलकर ज्यूनी यर कॉलेज ची 1995-96 ची 12 वी ची बैच 17 डिसेंबर ला एकत्र आली .ज्यूनीअर कॉलेज चा अल्लड़ टप्पा ओलांडल्या नंतर प्रत्येक जण आपआपल्या ध्येयाकड़े मार्गक्रमण करत शिक्षणाच्या वाटा निवडत विखुरले गेले .
आयुष्यातील चांगल्या संधी, स्पर्धा परीक्षा,नोकरी,लग्न व घरच्या जबाबदारया या सर्वात प्रत्येकजण गुंतत गेल्यानंतर अचानक वॉट्सअप ग्रूपच्या जमान्यात वर्ग मैत्रीण शीतल हळदणकर ने विखुरलेल्या सर्वांना ग्रुप बनवत एकत्र आणल.चैट च्या माध्यमातून बोलता बोलता एक दिवस प्रत्यक्ष भेटण्याची संकल्पना मांडण्यात आली .आणि 17 डिसेंबर शिरोडा -वेळागर ठिकाण व तारीख नक्की झाली .
17 तारीख ला जगाच्या कानाकोपर्यातून प्रत्येक जण आपले शैशव सहकारी शोधत भेटण्याच्या उत्सुकतेने वेळागर ला पोहचले .खूप साऱ्या गप्पा -टप्पा,फनी गेम्स,प्रत्यक्ष ओळख -परेड अप्रतिम स्नेहभोजन आणि जोश आणि उमेद देणाऱ्या आठवणी ची शिदोरी सोबत घेत पुढील वर्षी नक्की भेटण्याचा संकल्प घेत निरोप घेण्यात आला .








