सिंधुनगरी | प्रतिनिधी : रागाच्या भरात पोटात चाकू खुपसून आपल्या सख्ख्या पुतण्याचा खून केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील पोईप येथील सुभाष श्रीधर माधव या आरोपीला सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यानी 3 वर्ष सश्रम करावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
मालवण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 78/2017( सेशन केस नंबर 33/ 2017) भा. द. वि कलम 307 आरोपी सुभाष श्रीधर माधव रा. पोईप मालवण या आरोपीने सख्ख्या पुतण्याचा रागाच्या भरात पोटात चाकू खुपसून दिनांक 20/ 05/ 2017 रोजी खून करण्याचा प्रयत्न केला होता. सदर गुन्ह्याचा तपास हवालदार व्हि डी जोशी व पी आय बोडके यांनी केलेला होता. आरोपीने रागाच्या भरात आरोपीने गुन्हा केलेला होता. सदर गुन्ह्यात सरकारतर्फे महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले होते. अचानक रागाच्या भरात गुन्हा घडल्याचे पुराव्यात दिसून आल्याने आरोपी विरुद्ध कलम 326 अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भारुका साहेब यांनी दोषी धरले व आरोपीला *भादवि कलम 326अन्वये 3 वर्ष सश्रम करावास व दोन हजार रुपये दंड* अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी संपूर्ण केस चालवली व युक्तिवाद ही केला होता. सदर केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरता , पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील वगैरे टीम यांनी मोलाचे सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने एडवोकेट गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.











