दोडामार्ग l सुहास देसाई :न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी श्रेया राजन झोरे इयत्ता आठवी हिने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबोली पुरस्कृत सावंतवाडी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सावंतवाडी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात विद्यार्थीनी तिच्या या यशाबद्दल संस्था समन्वय समिती सहसचिव तथा प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, क्रीडा शिक्षक एच. आर. सावंत, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. वडील राजन भैरू झोरे व काका संतोष भैरू झोरे यांचे विशेष मार्गदर्शन श्रेया ला लाभले.
फोटो
श्रेया हिचे अभिनंदन करताना शिक्षक वर्ग











