उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे वेशभूषा आणि लंगार नृत्य स्पर्धेत यश

वेगुर्ला l प्रतिनिधी :देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन नुकतेच वेंगुर्ले साई मंगल हाॅल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या संमेलनात विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्पर्धा ही घेण्यात आल्या या स्पर्धेत वेशभूषा आणि लंगार नृत्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश मिळवत बाजी मारली.

दशावतारी वेशभूषा स्पर्धेत इयत्ता आठवी ची सेजल नितीन रेडकर हिने केलेली रुक्मिणीची वेशभूषा या स्पर्धेतील सर्वोत्तम वेशभूषा ठरली तर याच विद्यालयाचा

दहावीचा दिपेश जयराम वराडकर यांने साकारलेला मारुती व्दितीय क्रमांक विजेता ठरला उत्तेजनार्थ हि पारितोषिक या प्रशालेच्या वीर नारायण गावडे आणि नैतिक कृष्णकांत नाईक या विद्यार्थ्यांनी मिळवले.

तर या संमेलनातील लंगार नृत्य स्पर्धेत दिपेश वराडकर आणि वीर गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला

स्पर्धेतील सर्व विजेत्याना

विशेष मार्गदर्शन खानोलकर दशावतार मंडळाचे संचालक व मृदुंगमणी बाबा मेस्त्री, हार्मोनियम वादक पप्पू घाडीगांवकर ताल रक्षक आकाश खानोलकर या सह सुभाष केरकर,आबा कलिंगण या बरोबरच प्रशालेचे लिपिक अजित केरकर लोककला अभ्यासक आणि हिंदी विषयाचे शिक्षक प्रा. वैभव खानोलकर या बरोबरच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हि मार्गदर्शन व सहकार्य केले.

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलच्या या सर्व विजेत्यांना रोख रूपये आणि सन्मानचिन्ह देऊन या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ अशोक भाईडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले

या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष निवृत्त गट शिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या स्पर्धेचे विजेते ठरलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी या बरोबरच विनामूल्य मार्गदर्शन करणारे खानोलकर मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री, पप्पू घाडीगांवकर,आकाश खानोलकर, सुभाष केरकर, मेस्त्री,आबा कलिगण तसेच यशस्वी विद्यार्थी आणि पालकाचे यांचे हि विशेष अभिनंदन केले.

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन केलेल्या दमदार कामगिरीचे विविध स्तरांवर कौतुक केले जात असुन त्याचावर अभिनंदनचा वर्षाव होत असुन या स्पर्धेचे परिक्षक पप्पू नादोसकर आणि महेश गवंडे यांनी हि या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे