रत्नागिरीतील ‘सावकारी’ प्रकरणी निलेश किर वर आणखी एक गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी : सावकाराकडून घेतलेल्या पैशांची रक्कम फेडूनही व्याजाची रक्कम वाढवून फिर्यादीची जमिन बळजबरीने करारपत्र करुन धेउन ती बळकावत फसवणूक केल्याप्रकरणी निलेश किर (42,रा.भाटिमिर्‍या,रत्नागिरी) विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना सन 2019 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत मारुती मंदिर आणि करबुडे येथे घडली आहे.

याबाबत जयवंत रामचंद्र कळंबटे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,त्यांनी निलेश किर कडून काही रक्कम घेतली होती.ती रक्कम सव्याज फेडूनही निलेश किरने त्यांच्या रिक्षाचे परमिट ठेवून घेतले होते.तसेच वेळोवेळी व्याजाची रक्कम वाढवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत करबुडे येथील त्यांची जमिन बळजबरीने करारपत्र करुन घेत त्याचे खरेदी खत करुन बळकावली.तसेच फिर्यादी यांचा भाउ स्वप्निल कळंबटेला जिल्हा शासकिय रुग्णालयात तर फिर्यादीला गणपती सणामध्ये करबुडे येथील घरी अन्य साथीदारांना नेउन शिवीगाळ करत मारहाण केली होती.