गतिमानता पंधरवड्यात तालुकानिहाय मेळावे

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवडा दि.18 ते 30 डिसेंबर पर्यत घोषित केला आहे. त्यानिमित्ताने जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यामातून गोळा करणे आणि ते ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे पोर्टलवर भरणे, माहिती देणे, प्रचार करणे इ. करण्यात येणार आहे. या मोहिमेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज हे निःशुल्क भरून दिले जातील. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात बॅनर व आणि ऑडियोच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या योजनेमधून जास्तीत जास्त लाभाथ्यांचे अर्ज प्रस्ताव त्यांच्या कागदपत्रासहित स्वीकारून त्यांची तात्काळ छाननी होणार असून बँकेकडे अशी प्रकरणे लवकरात लवकर आणि प्राधान्याने मंजूर करून घेण्याचा प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्र, करणार आहे. यामध्ये बँकेकडून उपयोगिता प्रमाणपत्रे जमा करणे, बैंकेत रखडलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रकरणे मारगी लावणे हा मुख्य हेतू आहे.

 दि. 18 डिसेंबर 2023 पासून हा पंधरवडा सुरू झाला असून या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पंचायत समिती/ग्रामपंचायत, जिल्हा परिषद येथे प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी / उद्योग निरीक्षक हे त्या वाहनासोबत हजर राहून उपस्थितांना मार्गदर्शन करतील, त्यांच्या शंका व अडचणींचे निराकरण करतील, तरी लाभाथ्यांनी या जनजागृती मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे.

गतिमानता पंधरवड्यात तालुकानिहाय मेळावे पुढीलप्रमाणे आयोजित केले आहेत.

  मालवण दि. 19 डिसेंबर, वेंगुर्ला दि. 20 डिसेंबर, कणकवली दि. 21 डिसेंबर, कुडाळ दि. 22 डिसेंबर 2023, सावंतवाडी दि. 26 डिसेंबर, दोडामार्ग दि. 27 डिसेंबर, देवगड दि. 28 डिसेंबर, वैभववाडी दि. 29 डिसेंबर, ओरोस मुख्यालय दि. 30 डिसेंबर 2023 येथे मेळावे आयोजित केले आहेत.