रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील कोतवडे येथे नारळाच्या झाडावरुन पडून गंभिर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.ही घटना रविवार 17 डिसेंबर रोजी रात्री 21.15 वा.घडली.
योगेश शंकर धुमक (42,रा.सड्ये पिरंदवणे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्यांच्या भावाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार,योगेश हा मजुरी करायचा रविवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा.तो कोतवडे येथील रजनिकांत ठोंबरे यांच्या नारळ बागेत नारळ काढण्यासाठी गेला होता.नारळाच्या झाडावर 30 फूट उंचावर गेल्यावर योगेश माडाच्या झावळीला धरुन नारळ पाडत होता.
त्यावेळी अचानकपणे झावळ तुटल्याने योगेशने माडाचा आधार घेतला असता तो नारळाच्या झाडाला चिकटून 10 फूट खाली आल्यावर त्याचा हात सूटून तो जमिनीवर पडला.त्यामुळे त्याच्या छातीच्या बरगडीला,हाताला व पायांना दुखापत झाल्याने त्याला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्याठिकाणी उपचार करुन त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुणालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी योगेशला तपासून मृत घोषित केले.याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.










