गुहागर BREAKING: वेळंब मार्गावर संशयास्पद वाहतूक करणारा ट्रक बंद अवस्थेत

प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील वेळंब रस्त्यावर संशयास्पद वाहतूक करणारा ट्रक काल शनिवारपासून बंद अवस्थेत आहे. येथील धोक्याच्या वळणावर सदर ट्रक K A 32 A A 81830 हा शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून बंद अवस्थेत आहे.मात्र अद्यापही प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतलेली नाही
सदर ट्रकवर असणारे दोन्ही चालक परप्रांतीय असून त्यांना वेळंब ग्रामस्थानी जाब विचारला असता व्यवस्थित माहिती देणे जमत नसल्याने येथील ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत.मुख्य म्हणजे हा ट्रक शनिवारी सकाळपासून येथील अवघड वळणावर बंद अवस्थेत असल्याने येथून वाहतूक करणे देखील धोकादायक बनले आहे.
मुख्य म्हणजे यापूर्वी अशीच अवजड व अवैध वाहतूक करणारा ट्रक सदर बंद पडलेल्या ट्रकच्या 500 मीटर अंतरावर जळून खाक झाला होता.या प्रसंगानंतर येथून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली होती.मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.
मुख्य म्हणजे शेजारील घरालाही या अवजड वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वेळंबचे उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी ग्रामस्थांच्यावतीने केले आहे.यावेळी वेळंब भाजपचे युवा कार्यकर्ते दीपक मोरे ,भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.