कणकवलीत दुचाकी व तीन मोबाईल गेले चोरीला

कणकवली : कणकवली शहरात मंगळवारी चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कणकवली बस स्टँड शेजारी एका ज्वेलर्स समोर लावण्यात आलेली एक्टिवा दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. तसेच कणकवली बस स्टॅन्ड व संचयनी कॉम्प्लेक्स ते कल्प कॉर्नर या दरम्याने संजीव देसाई यांचा एक मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडली आहे. त्यामुळे मंगळवार बाजारात गर्दीचा फायदा या चोरट्यांनी घेतल्याची चर्चा कणकवली शहरात रंगली आहे.