कळंबणीनजीक अपघातात दोघेजण जखमी

खेड (प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी आपेडे फाट्यानजीक बुधवारी सकाळच्या सुमारास खासगी आराम बसला झालेल्या अपघातात १६ प्रवाशांपैकी दोघेजण जखमी झाले. चालकास झोप अनावर झाल्याने अपघात घडला.

 

प्रशांत दत्तात्रय साळवी (५२), कृष्णा गणपत कालक (६९ दोघेही रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत. चालक गणेश केशव डांगे (३७) हा एम.एच. १२ बी.एच. २२७५ क्रमांकाच्या आराम बसमधून १६ प्रवाशांना घेवून पुणे येथून भरणे येथे येत होता. चालकास झोप अनावर झाल्याने रस्तालगतच्या दुभाजकावर बस आदळून अपघात घडला. जखमींना उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक पी. एस. धडे व सहकारी यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.