खेड राष्ट्रवादी (पवार गट) स्वगृही परतणार ?

खेड (प्रतिनिधी)राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्यांच्या गटात सामील झालेले राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) शेकडो कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारी आहेत. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत येथील अनिकेत शॉपिंग

सेंटर सभागृहात लवकरच पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांनी दिलेल्या पदाच्या राजीनाम्यानंतर महिन्यांपासून रिक्त जागी ऐनवरेचे माजी सरपंच संजय जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र अचानक त्यांचे नाव वगळले

गेले. तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांचा राजीनामा फेटाळून लोकसभा निवडणुकीपर्यंत संघटनेत कुठल्याही प्रकारचे बदल न करण्याची भूमिका

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतता निर्माण झाल्याचा सूर आळवण्यात येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांत घुसफूस निर्माण झाली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तालुका दौरावर आले असता काही कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

याचमुळे अजित पवार गटातील नाराज कार्यकर्ते पुन्हा शरद पवार गटात सामील होण्याच्या तयारीत T. आहेत. लवकरच जाहीर पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष उमेश कदम यांनी दिला. या गटातील किती कार्यकर्ते प्रवेश करतात याकडे लक्ष लागले आहे.