‘अभ्यंकर कुलकर्णी’च्या ‘छंदोत्सव’मध्ये विज्ञान शाखेला सर्वसाधारण तर कला शाखेला सांघिक विजेतेपद

रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सव 2023 मध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी जवाहर क्रीडांगणावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य वरदराज पंडित, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दूदगीकर प्रभारी प्राचार्य प्रफुल्ल दत्त कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा.सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा.विद्याधर केळकर, छंदोत्सव प्रमुख वैभव कानिटकर, क्रीडा शिक्षक प्रा.लीना घाडीगावकर व प्रा.राकेश मालप, श्री विनोद मयेकर, आणि चारही शाखांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावर्षीच्या क्रीडा स्पर्धा मधील सर्वसाधारण विजेतेपद विज्ञान शाखा तर सांघिक विजेतेपद कला शाखेने पटकाविले. फुटबॉल फुटबॉल मुले विजेता अकरावी शास्त्र तर व्हॉलीबॉल मुले विजेता बारावी कला ठरला. व्हॉलीबॉल मुली अकरावी कला, क्रिकेट मुले बारावी शास्त्र, क्रिकेट मुली अकरावी वाणिज्य, रस्सीखेच मुले अकरावी शास्त्र, रस्सीखेच मुली अकरावी शास्त्र ,कबड्डी मुले बारावी कला, कबड्डी मुली बारावी कला ,रिले मुलगे बारावी विज्ञान, मुली बारावी कला विजयी ठरले. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये कॅरम मुले हर्ष मिथुन शिवगण, मुली श्रावणी कोलगे, तर बुद्धिबळ मुले सौरीश आशिष कळकर आणि मुली तीर्था संदीप मांजरेकर हे विजयी झाले. बॅडमिंटन मुले शायान फिरोज गवाणकर,
तर मुलींमध्ये मैत्रेयी भुर्के हे विजयी झाले.

100 मीटर धावण्यामध्ये प्रथम पार्थ शेलार 200 मीटर धावण्यामध्ये प्रथम गौरव रेवाळे ४०० मीटर गौरव रेवाळे, 800 मीटर आशिष भातडे पंधराशे मीटर युवराज गावडे यांनी क्रमांक मिळविला. गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक रुद्र शिवणेकर लांब उडी मध्ये गौरव रेवाळे यांनी प्राप्त केला. 100 मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम क्रमांक सलोनी हळदे , 200 मीटर धावणे मुलींमध्ये सानिका रोडेकर 400 मीटर धावणे मध्ये वैष्णवी तांबे ८००मीटर धावणे मध्ये वैष्णवी तांबे १५०० मीटर मध्ये तनया मिलके यांनी यांनी क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक बिसना थापा, लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी तांबे यांनी मिळविला. सर्व विजेत्यांचे पारितोषिक देऊन मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.