
बागवे हायस्कुल मसुरेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते डॉ. निलेश राणे यांचा सत्कार
मसुरे | झुंजार पेडणेकर :शालेय वयात तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. या जगात स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची वेळ आली तर आपण हरणार नाही अशी जिद्द मनात बाळगा. आज व उद्या यातलं अंतर ओळखलं तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकाल. ज्यांनी शिस्त पाळली तेच काहीतरी बनू शकतात. राणे साहेब यांना राजकारणात ३९ वर्षांनी मुख्यमंत्री पद मिळाले. त्यामुळे जिद्द मोठी ठेवा. पालकांनी मुलांचे त्यांच्या मनाविरुद्ध करिअर घडवू नये. जिल्ह्यात मोठी गुणवत्ता आहे. अनेक दिग्गज कोकणातून घडले आहेत. मोबाईल मुळे जग बदलत आहे. ही पिढी बिघडू नये यासाठी पालकांनी लक्ष द्यावे. या भागातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. दीपक परब, सचिन तेंडुलकर घडावेत म्हणजे सिंधुदुर्ग अधिक वेगाने पुढे जाईल असे प्रतिपादन भाजप नेते तथा माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी येथे केले.
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल आणि तांत्रिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉ दीपक परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी जी प अध्यक्ष सौ.सरोज परब, माजी प. स. सदस्या सौ गायत्री ठाकूर, मालवण माजी नगरसेवक पंकज सादये, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, प्रभारी मुख्याध्यापक रमेश पाताडे, पंढरीनाथ नाचणकर, पंढरीनाथ मसुरकर, कांबळे सर, विलास मेस्त्री, भरत ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी माजी खास. निलेश राणे म्हणाले, या प्रशालेच्या सभागृहाच्या उर्वरित कामासाठी लवकरात लवकर जितके शक्य होईल तेवढे करण्याचा आपला प्रयत्न राहील. शैक्षणिक संस्था चालविणे कठीण गोष्ट बनली आहे.आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याचे धमक राणे साहेबांप्रमाणे डॉ. दीपक परब यांच्यामध्ये दिसते. कमावलेले पैसे कुटुंबासाठी नाही तर ज्या गावाने मला ओळख दिली त्या गावासाठी काहीतरी करण्याची धमक परब यांच्या कृतीतून दिसते. लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्याची इच्छा दीपक परब यांच्याकडे असते.
पैसा अनेकांकडे असतो पण देण्यासाठी दानत लागते. आपल्या गावात डॉ. दीपक परब यांच्या जवळ ती दानत आहे याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. यावेळी अध्यक्ष डॉ दीपक परब म्हणाले, या वयात अभ्यासाकडे लक्ष द्या. डिस्टन्स एज्युकेशनने सर्व गोष्टी आत्मसात करू शकता. पण खरे शिक्षण शाळेतच मिळते. शाळेतून शिकल्यावर ही शाळा माझी शाळा आहे हे कायम लक्षात ठेवा. आवडीच्या क्षेत्रात मुलांनी प्रवेश करावा व यासाठी शिक्षकांनी लक्ष द्यावे. राणे कुटुंबाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात. त्यामुळे आज आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी डॉ निलेश राणे यांना आमंत्रित केल्याचे श्री परब म्हणाले. यावेळी महेश बागवे, सौ सरोज परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक रमेश पाताडे, भानुदास परब, श्री पेडणेकर, सुनील बांदेकर, भरत ठाकूर, शशांक पिंगुळकर,एन. एस. जाधव, श्री किरण घाटे, सिद्धेश हळवे, समीर नाईक, सौ.तळाशिलकर, श्रीमती जाधव, सौ भोगले, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट आदी कर्मचारी उपस्थित होते. आभार भरत ठाकूर यांनी मानले.












