उद्योजक प्रकाश गायकवाड यांना पितृषोक

देवगड येथील सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश गायकवाड यांचे वडील वेताळराव यशवंत गायकवाड (८०) यांचे मंगळवारी सकाळी सोलापूर- अकलुज बागेचीवाडी येथील मूळ निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.’आण्णा’ या नावाने ते सुपरिचित होते. ते प्रगतशील शेतकरी होते. पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी गीता गायकवाड यांचे ते सासरे होत.