सदनिका व्यवहार प्रकरणी राकेश कोळी यांना अटकपूर्व जमीन मंजूर

खेड(प्रतिनिधी) सदनिकेवर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई केल्याचे भासवून १२ लाख ७३ हजार ११० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांवर पेथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यातील सदनिकाधारक राकेश एकनाथ कोळी यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी एका बँकेचे विभागीय व्यवस्थापक दवे, व्यवस्थापक धीरजकुमार, अधिकारी कर्मबळे, राव (सर्व रा. लोटे वरत्नागिरी), मूळ सदनिकाधारक राकेश कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणो गजेंद्र खेडेकर यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , यातील फिर्यादी यांनी वृत्तपत्रामध्ये सरफेसी अॅक्ट २००२ चे अंतर्गत ई-लिलाव विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामध्ये मौजे भरणे (ता. खेड) येथील एका इमारतीतील निवासी सदनिका रुपये १२ लाख एक हजार रुपयांना खरेदी केली होती. तसेच दुय्यम निबंधकांकडे नोंदणी प्रकियेसाठी ७२ हजार ११० रुपये खर्च केला होता. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांनी एका राष्ट्रीयीकृत बँक अधिकारी यांच्याकडे सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी विनंती करूनही सदनिकेचा ताबा त्यांना दिला नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे.

२८ डिसेंबर २०१६ रोजी बँकच्या लोटे शाखेला सदर सदनिकेबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाचत खेड दिवाणी न्यायालयनि आदेश केले. ही बाब बैंक अधिकाऱ्यांना माहिती होती, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदर सदनिकेचे प्रोप्रायटर तानाजी कदम यांना राकेश कोळी यांनी संपूर्ण मोबदल्याची रक्कम अदा केली नसल्याने सदर सदनिकेचा ताबा त्यांनी राकेश कोळी यांना दिलेला नव्हता. सदरचा कब्जा राकेश कोळी यांच्याकडे नसल्याने तो कब्जा संबधित बँकेच्या झोनल कार्यालय रत्नागिरी व शाखा लोटे यांच्याकडे हस्तांतरित झालेला नव्हता. याची पूर्ण जाणीव त्या बँकेचे अधिकारी यांना असून देखील त्यांनी कोळी यांच्याशी हातमिळवणी करत सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई केल्याचे भासवून व तसे खोटे कागदपत्रे तयार केली. सदनिकेचा ताबा आहे असे भासवून फिर्यादीची एकूण १२ लाख ७३ हजार ११० रुपयांची फसवणूक केली आहे असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी ऍडव्होकेट प्रियेश तलाठी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने राकेश एकनाथ कोळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.