राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या मौजे शीळ येथील श्री दत्तगुरू सेवा मंडळ वरची बाईतवाडी यांच्या वतीने मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सकाळी १० वाजता जन्म सोहळा, षोडशोपचार पूजा व आरती, सकाळी ११ वाजता होमहवन, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता हळदीकुंकू समारंभ, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री दत्तगुरू सेवा मंडळाचे भजन, रात्रौ ८.३० वाजता स्वागत व सत्कार समारंभ तर रात्रौ ९ वाजता ‘रंग लावणीचा जल्लौष रत्नागिरीच्या कलाकारांचा’ हा लावणी, कोळीगीत, हिंदी मराठी गाणी व मिमिक्रीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी भाविकांनी दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तगुरू सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.










