भांबेड पवारवाडी येथे २६ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील भांबेड येथील उत्कर्ष मंडळ पवारवाडी, यांच्यावतीने २६ डिसेंबर रोजी औदुंबर श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे .

परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले, श्री सद्गुरु परमपूज्य अनंतभट महाराज, गाणगापूर यांच्या पौरोहित्याखाली स्थापन झालेल्या औदुंबर श्री दत्त मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी २६ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहे.
सकाळी ६ ते ७ वा. प्रातःपूजा सकाळी ७ ते ८ वा. श्री दत्त मूर्तीस महाअभिषेक, सकाळी ८ ते १२ वा. श्री दत्तात्रय पादुका मिरवणूक, दुपारी १२ ते १.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद व सुस्वर भजन पवारवाडी संध्या. ५ ते ६ वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप व दीपोत्सव संध्या. ६.०१ ते ६.३० वा. श्री दत्त जन्म भजन / आरती सायं. ६.३० ते ८.०० वा. पालखी नाचवणे सायं. ८.३० ते ९.३० वा. वै. ह.भ.प. सोनूबाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्था यांचा हरिपाठ व मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायं. ७.३० ते ९.०० वा. महाप्रसाद भंडारा, रात्री १०.०० ते ११.३० वा. मुला मुलींचे रेकॉर्ड डान्स स्पर्धा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष मंडळ पवारवाडी, भांबेड चे अध्यक्ष गोपीनाथ पवार, कार्याध्यक्ष श्रीधर बाईत, सचिव सुरेश धडम, खजिनदार संदीप सावंत, श्री दत्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष दिनेश पवार, सचिव मंगेश बाईत, खजिनदार चंद्रकांत धडम हे मेहनत घेत आहेत.