लोककला महोत्सवाचे रविवारी उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांची उपस्थिती

भव्य शोभायात्रेने होणार प्रारंभ

सलग चार दिवस होणार लोककलांचा जागर

समारोपाला महिलांचे दशावतार ठरणार लक्ष्यवेधी

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने श्री जुना कालभैरवच्या मैदानावर पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आज रविवारी उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री ना. सामंत यांच्यासह अन्य मान्यवरांचीही या वेळी उपस्थिती असेल. सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रेने या लोककला महोत्सवाचा प्रारंभ होईल. या शोभायात्रेतून कोकणी लोककलांचे दर्शन घडणार आहे.

या महोत्सवात कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. ठाणे, पालघरपासून ते अगदी सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकथी यासह कोकणला सामाविणाऱ्या लोककला या महोत्सवात एकत्र आणल्या जाणार आहेत. यानिमित्त 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शहरात कोकणातील विविध कलाकार, नागरिक व विद्यार्थ्यांची शोभायात्रा निघणार आहे. पवन तलाव मैदान या ठिकाणी नटराज पूजन होईल. बालकलाकार रुद्र बांडागळे गाऱ्हाणे घालेल व शोभायात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर महोत्सवाच्या मंडपात सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 4 वाजता स्थानिकांसाठी खुला रंगमंच, 6 वाजता लोककला सादरीकरणामध्ये देवाला गाऱ्हाणे योगेश बांडागळे (देवरुख), गोंधळी शंकर यादव व सहकारी, संकासूर व गोमू असगोली भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळ, लोकवाद्ये मैफल डीबीजे महाविद्यालय, गज्जा नृत्य कळसुळी नवजीवन मित्र मंडळ, उखाणे नेहा सोमण आणि सहकारी, सापाड तरवळ श्री गणेश मित्र मंडळ, नमन व रावण सड्ये-रत्नागिरी सुंकाईदेवी प्रासादिक नमन मंडळ. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कोकणातील खाद्य संस्कृती विषयावरील परिसंवादात राजीव लिमये, मुग्धा लिमये, सुजाता साळवी चिटणीस सहभागी होणार आहेत. 11 वाजता जाखडी काल, आज आणि उद्या विषयावरील परिसंवादात डॉ. सूर्यकांत चव्हाण, मधुकर पंदेरे, शंकर भारदे, विजय कुवळेकर, अनिल गावडे सहभागी, सायंकाळी 4 वाजता लोककला कट्टा स्थानिकांसाठी खुला रंगमंच, 6 वाजता लोककला सादरीकरण देवाला गाऱ्हाणे सुनिल बेंडखळे (रत्नागिरी), चित्रकथी शंकर मस्के (सिंधुदुर्ग), पुंभार दौलत पालकर आणि सहकारी (गुहागर), भेदीक शाहिरी मधुकर पंदेरे व सहकारी (लांजा), जाखडी- नवलाई देवी नाच मंडळ-लांजा, तारफा-तलासरी-बोर्डी तारफा-पालघर, घोरनृत्य- मरवडा घोर नृत्य- पालघर, दशावतार तेंडोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ-सिंधुदुर्ग.

7 रोजी सकाळी 10 वाजता रत्नभूमीतील लोककला विषयावरील परिसंवादात माधव भंडारी, बाबू घाडीगांवकर, रमेश सावंत, दुर्गेश आखाडे, अमित ओक, 11.45 वाजता लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती विषयावरील परिसंवादामध्ये डॉ. सूर्यकांत आजगांवकर, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. निधी पटवर्धन, रुपाली आणेराव, अमोल पालये, सायंकाळी 4 वाजता लोककट्टा स्थानिकांसाठी खुला मंच, 6 वाजता लोककला सादरीकरण, देवाला गाऱ्हाणे सचिन काळे (रत्नागिरी), काटखेळ श्री चंडिकादेवी मंदिर दापोली, गौरी टिपरी व गोफ नृत्य राधाकृष्ण महिला मंडळ रत्नागिरी, म्हणी आणि शिव्या- सुनिल बेंडखळे (रत्नागिरी), पोवाडा- प्रदीप मोहिते (चिपळूण), नकटा निवबाळ विकास मंडळ दापोली, कोळी नृत्य-दुर्वास पायकोळी, नामदेव खामकर आणि सहकारी-रायगड, डेरा-कासारवाडी डेरा खेळ दापोली, होळी व पालखी नृत्य देवी पद्मावती पालखी नृत्य मंडळ चिपळूण,8 रोजी सकाळी 10 वाजता नमनाचा अनुबंध विषयावरील परिसंवादामध्ये मुकुंद कुळये, युयुत्सू आर्ते, वैभव सरदेसाई, सुनिल बेंडखळे, विलास बुदर, 11.45 वाजता शाश्वत पर्यटन या विषयावरील परिसंवादामध्ये आशुतोष बापट, वैभव सरदेसाई, प्रसाद गावडे, सचिन कारेकर, मकरंद केसरकर, सायंकाळी 4 वाजता लोककला समारोप होणार असून या वेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहाणार आहेत.

सायंकाळी 7.30 वाजता लोककला सादरीकरण देवाला गाऱ्हाणे अक्षता कांबळी (सिंधुदुर्ग), मंगळागौर चिपळूण लोककला महिला मंडळ, कातकरी गणेशपूर आदिवासी मंडळ चिपळूण, मुस्लीम गीते व खालू बाजा मैनुद्दीन चौगुले आणि सहकारी चिपळूण, जलसा मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसा कोकरे चिपळूण, वैदिक लग्नगीते सुवर्णा पाथरे रत्नागिरी, घोरीप रवळनाथ नमन मंडळ रत्नागिरी, महिला दशावतार सिंधुरत्न महिला दशावतार सिंधुदुर्ग आदी कार्यकम होणार आहेत.याशिवाय कोकणी खाद्यसंकृतीचे स्टॉल्स या ठिकाणी असतील. लोककलांबरोबर, खाद्य व पर्यटन महोत्सव असेही या महोत्सवाचे स्वरुप असणार असून सर्वांनी या महोत्सवाला हजेरी लावावी, असे आवाहन लोटिस्माचे कार्याध्यक्ष डॉ. यतिन जाधव, लोककला महोत्सव समितीचे प्रमुख संयोजक प्रा. संतोष गोणबरे यांनी केले आहे.